33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयAjit Pawar : कोरोनामुक्त अजित पवार मंत्रालयात अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ajit Pawar : कोरोनामुक्त अजित पवार मंत्रालयात अ‍ॅक्शन मोडमध्ये

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोरोनामुक्त झाल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उपचारानंतर कोरोनामुक्त झालेले अजित पवार यांनी आज मंत्रालयात हजेरी लावत कामकाजाला सुरुवात केली.

कोरोनानंतर काही दिवस क्वारंटाईन झालेले अजित पवार आज पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेसबूक लाईव्ह करत याची माहिती दिली. अजित पवार कोरोनामुक्त झाले होते, त्यावेळी देखील सुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअ‍ॅप स्टेटस ठेवत सर्वांचे आभार मानले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 2 नोव्हेंबरला कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 7 दिवस आराम केल्यानंतर अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे.

अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच उपचार सुरु होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी